वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीचा प्रतिवर्षाप्रमाणे ओटी भरण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 29 रोजी साधेपणाने करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोनामुळे साधेपणाने कार्यक्रम करण्याचे नुकत्याच झालेल्या देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मंगळवार दि. 29 रोजी देवस्थान पंच कमिटीतर्फे श्री लक्ष्मी देवीची ओटी भरण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी ओटी भरण्यासाठी मंदिरकडे येऊ नये याची नोंद ग्रामस्थांनी घेण्याचे आवाहन देवस्थान पंच कमिटीतर्फे करण्यात येत आहे.