सॅमसंग, सोनी आणि बीएमडब्लू यासारख्या ब्रॅण्डचा समावेश
नवी दिल्ली
वर्षभरातील सर्वात मोठा कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस 2022) सुरु झाला आहे. या शोमध्ये नवीन टेक्नॉलॉजीने युक्त अनेक उत्पादने सादर करण्यात आली आहेत. या कार्यक्रमात सॅमसंग, सोनी आणि बीएमडब्लू यासारख्या ब्रॅण्डच्या उत्पादनांचाही समावेश आहे. ज्यामध्ये सॅमसंगने 180 डिग्रीमध्ये फिरणाऱया प्रोजेक्टरचे सादरीकरण केले आहे. तसेच बीएमडब्लूने आयएक्स नावाची एक अशी इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. जी रंग बदलणारी आहे.
यातीलच महत्वाची उत्पादने ः
1.सॅमसंग फ्री स्टाइल पोर्टेबल स्क्रीन
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने नवीन पोर्टेबल स्क्रीन आणि इंटरटेनमेन्ट उपकरण, द फ्रीस्टाईल सादर करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये स्मार्ट स्पीकर आणि एंबियंट लाईटिंग उपकरणाचा समावेश आहे.
2. मायक्रो एलईडी, नियो क्यूएलईडीसह लाईफस्टाईल टीव्ही
सॅमसंगचा मॉडर्न डिस्प्ले स्वरुपात मायक्रो एलईडी टीव्ही 25 दशलक्ष मायक्रोमीटरचा आकार एलईडीसाठी बेस्ट इन क्लास पिक्चरची गुणवत्ता देत आहे. सॅमसंगने तीन आकारात 110 इंच, 101 इंच आणि 56 इंचामध्ये मायक्रो एलइडी टीव्ही सादर केले आहेत.
3. सोनीची इलेक्ट्रिक कार
सोनीने 7 सीटर असणारी एसयूव्ही व्हिजन एस 02 प्रोटोटाइप कार दाखविली आहे. यामध्ये सीईसी 2020 जी कार दाखवली होती तेच नाव दिले आहे. याला प्रतिसाद मिळत गेल्यावर कंपनी नवा प्लॅन करणार आहे.
4.बीएमडब्ल्यू आयएक्स
इलेक्ट्रिक कार
बीएमडब्ल्यूने आपल्या सर्व आयएक्स इलेक्ट्रिक कारमध्ये इनोवेटिव्ह योजनेचा कलर बदलण्याचा पर्याय ठेवला आहे. जर्मन कार कंपनीने शोमध्ये ही माहिती दिली आहे.