सलग दोन दिवस कागदपत्रांची तपासणी
प्रतिनिधी /बेळगाव
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, त्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांच्याशी संबंधित उद्योजक व कंत्राटदारांच्या घरांवर प्राप्तिकर खात्याने छापे टाकले आहेत. बेळगाव जिल्हय़ातही सलग दोन दिवस एका कंत्राटदाराच्या घरात तपासणी झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटप्रभा येथील कंत्राटदार जयशील शेट्टी यांच्या घरावर गोवा व बेळगाव येथील 16 हून अधिक अधिकाऱयांनी गुरुवारी धडक मारली आहे. गुरुवारी दिवसभर व शुक्रवारीही जयशील यांच्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळू शकली नाही.
सलग दोन दिवस बेंगळूर येथे येडियुराप्पा यांच्याशी संबंधित उद्योजक व कंत्राटदारांच्या घरात जोरदार तपासणी सुरू आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात 4 हजार कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. यासंबंधी झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकरच्या अधिकाऱयांनी राजकीय नेत्यांच्या समर्थकांवर छापे टाकले आहेत.