प्रतिनिधी / सातारा :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्यात आले. त्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेने निवेदनाद्वारे केली.
कोरोना योद्धा कर्मचारी परिषद सातारा जिल्हा यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोविड 19 अंतर्गत भरतीतील सर्व तात्पुरत्या स्वरूपातील (एन एच एम अंतर्गत) कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे श्रीनिक काळे, सातारा जिल्हा अध्यक्ष सोहेल पठाण, उपाध्यक्ष विराज शेटे, महिला अध्यक्ष सुषमा चव्हाण, तालुका अध्यक्ष रणजीत लिंगायत, सातारा तालुका संघटन प्रमुख सुरज शिंदे आदी उपस्थित होते.