भोपाळ
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारूती सुझुकीने आपल्या काही मोटारींच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने सेलेरियो वगळता इतर कार्सच्या किंमती 1.9 टक्के इतक्या वाढवल्या आहेत. विविध मॉडेल्सच्या किंमती विविध स्तरावर वाढल्या आहेत.
कच्च्या साहित्याच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ कारची किंमत वाढवण्यामागे असल्याचे कारण कंपीनीने पुढे केले आहे. कंपनीने एकंदर भारापैकी काही भार ग्राहकांवर टाकण्याचे ठरवले आहे. म्हणूनच काही कार्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.
भोपाळमधील मारूतीच्या डिलर्सनी सर्व कार्सच्या किंमती वाढवल्या आहेत. ऑल्टोची ऑनरोड किंमत 18 हजारापर्यंत वाढली आहे. याचपद्धतीने स्विफ्ट, डिझाइर, इको, अर्टिगा, एसप्रेसो या गाडय़ांच्या किंमती 25 हजारपर्यंत वाढवल्या आहेत.
चारवेळा वाढल्या किंमती
मारूतीने यावर्षी पहिल्यांदाच कार्सच्या किमती वाढवल्या असं नाही तर यापूर्वी तीनवेळा किमती वाढवल्या आहेत.
जानेवारीत 34 हजारपर्यंत किमती वाढवल्या होत्या. एप्रिलमध्ये काही मॉडेल्सच्या किंमती 22 हजारपर्यंत वाढल्या. पुन्हा जुलैत किंमती वाढवल्या गेल्या.