ऑनलाईन टीम / मुंबई :
मोहित कंबोज हा कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी एक खुलासा केला आहे. मुंबईत मोहित कंबोज यांच्या मालकीची 12 हॉटेल्स आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असून, कंबोज त्याच्या हॉटेलच्या आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी तो समीर वानखेडेंची मदत घेत होता, असे मलिक यांनी म्हटले आहे.
एका आयोजित पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले, कंबोजच्या हॉटेल्सचा व्यवसाय वाढावा यासाठी समीर वानखेडे त्याच्या शेजारील हॉटेल्सच्या मालकांवर खोटे गुन्हे दाखल करत. कुणाल जानी नामक व्यक्तीचे बास्कीन हे उच्चभू व्यक्तींमध्ये फेमस असलेले हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूला कंबोजने ओपा हॉटेल सुरू केले. हे हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोटय़ा प्रकरणात अडकवले. जेणेकरुन हे हॉटेल बंद होईल. वानखेडे आणि कंबोज हे 7 तारखेला ओशिवराच्या कब्रस्तानाच्याबाहेर भेटले. मात्र, पोलिसांचे सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे व्हिडीओ मिळाला नाही.