नंदगड /वार्ताहर
खानापूर-यल्लापूर राज्यमार्गावरील कक्केरी गावाजवळ बेळगावहून दांडेलीकडे हायड्रोजन पेरॉक्साईड गॅस घेऊन जाणारा टँकर शनिवारी पलटी झाला. टँकर पलटी होताच टँकर परिसरात धूर येऊ लागला. त्यामुळे येथून जाणाऱया लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लागलीच त्यांनी अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळानंतर अग्निशमन दलाचे वाहन तेथे आले. त्यांनी पाण्याद्वारे धुरावर व तेथील घटनेवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले.