करमाळा / प्रतिनिधी
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांना दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी श्री कमलाभवानी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या एक किलो चांदीच्या तलवारीचे पूजन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
विधिवत या तलवारीची पूजा करून श्री कमलादेवी चरणी अर्पण करण्यात आली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई येथे कार्यरत असलेले करमाळ्याचे मंगेश चिवटे यांनी आई कमला भवानी देवीला साकडे घातले आहे. करमाळा तालुक्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सोळा लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका करमाळा तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे
शिवाय शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना आर्थिक मदत व रूग्णालयाचे बिल कमी करून देणे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ही कामे करून देण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत अवताडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल ,महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड, युवा सेनेचे शहरप्रमुख विशाल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मयुर यादव ,शहर प्रमुख अविनाश भिसे ,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संज शीलवंत, तरडगाव चे सरपंच डॉ. अमोल घाडगे, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, सदस्य जयराम सोरटे, भाऊराव फुलारी, कमलादेवी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, संचालक अनिल पाटील , व्यवस्थापक गाठे, विजय पुजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.