सातारा, पांचगणी, लोणंद, म्हसवड, वडूज नगरपालिकेत प्रकार
प्रतिनिधी/ सातारा
कचरा गाडय़ाच्या माध्यमातून शहरातील कचरा गोळा करण्यात येतो. हाच कचरा गोळा करणाऱया कचऱयाच्या गाडीवरील कर्मचाऱयांच्या ईपीएफ, ईएसआयवर डल्ला मारण्याचा प्रकार तब्बल 23 महिने सुरु आहे. एकटय़ा सातारा नगरपालिकेत ठेकेदाराने चक्क कामगारांच्या हक्काचे, घामाचे 31 लाख 74 हजार रुपये हाणले गेले आहेत. तर जिह्यातील पाचगणी, लोणंद, म्हसवड, वडूज या नगरपालिकांमध्ये असाच गोलमाल ठेकेदाराने करुन माल कमवला आहे. त्याबाबत कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, कचरा व्यवस्थापनातून घोटाळाही आता होवू लागला आहे हे उघड होत आहे.
शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाच्यावतीने कचरागाडय़ाची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक पालिकेत पालिकेच्या मालकीच्या कचरा गाडय़ा आहेत. त्या कचरा गाडय़ांना पालिकेच्यावतीने व्यवस्थापन म्हणून ठेकेदारीची पद्धत सातारा जिह्यातील सातारा, पाचगणी, लोणंद, म्हसवड आणि वडूज या शहरात घरोघरी गोळा करण्यात येणाऱया कचरा संकलन करण्याचा ठेका भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीने घेतला होता. त्या कंपनीच्या अगोदरही सुरुवातीला साशा नावाची कंपनी साताऱयात आली होती. त्यावेळी तर कंपनीच्या नावावर अनेकजण मालामाल झाले. कोणी परदेशवाऱया करुन आले तर कोणी इमले बांधले अशीही चर्चा सुरु आहे. आता मात्र, चक्क सातारा शहरासह पाचगणी, लोणंद, म्हसवड आणि वडूज येथे कचरा गोळा करणाऱया कचरा गाडी कामगारांच्या ईपीएफ आणि ईएसआयवर डल्ला मारला जात असल्याची बाब माहिती आधिकार कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. त्यामुळे कामगारांच्या हक्काच्या पैशावर डोळा ठेवून शासनाच्या डोळय़ात फसवणूक करण्याचा प्रकार गेली 23 महिने सुरु आहे. त्याबाबतची लेखी तक्रार शुक्रवारी कामगार आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
सातारा पालिकेच्या कचरा गाडय़ांवर 69 कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱयांना नियमाप्रमाणे ईपीएफ दिला जात नाही. अतिशय जुजबी असा ईपीएफ दिला जातो. तर लोणंद येथे प्रत्यक्षात 16 जणांचा ईपीएफ भरला जातो. तर ठेक्यात 26 जण आहेत. असा सगळा पाच नगरपालिकेतील कचरा गाडय़ावरील कर्मचाऱयांच्या मानधनातून माल कमवण्याचा प्रकार सुरु आहे. केवळ एकटय़ा सातारा पालिकेतून तब्बल 23 महिन्यात सुमारे 31 लाख 74 हजार रुपयांची रक्कम हडप केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, कामगार आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की वर्कऑर्डरप्रमाणे कामगारांची संख्या व प्रत्यक्षात ई.पी.एफ व ई.एस.आय. द्वारे जमा होत असलेल्या शासनाच्या किमान कामगार वेतन कायद्याप्रमाणे रक्कमेची पडताळणी केल्यास आर्थिक तपावत दिसून येत आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत किमान वेतन कायद्याप्रमाणे जमा होणारी रक्कम व प्रत्यक्षात भाग्योदय या कंपनीकडून जमा होत असलेली रक्कम यामध्ये मोठय़ा प्रमाणात आर्थिक तफावत दिसून येत आहे. त्यामुळे कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असून त्याची चौकशी कररण्यात यावी, या कंपनीने वर्कर ऑर्डर घेतलेल्या तारखेपासून आजपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे जमा केलेल्या रक्कमेचा तपशील पाहिल्यास शासनाची व कामगारांची आर्थिक फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
कचरागाडीवरचे कामगारही आक्रमक
कचरागाडीवर असणाऱया कर्मचाऱयांच्या पीएफवर डल्ला ठेकेदार मारत असल्याची बाब उघडकीस येताच सर्व कर्मचारी आक्रमक झाले असून तेही या प्रकरणी प्रशासनाकडे याची दाद मागणार आहेत. घेतलेल्या पैशाची वसुली करण्याची मागणी करणार आहेत, असे समजते.