चोरी प्रकरणाची चौकशी आयुक्तांनी करण्याची मागणी : वॉचमन असताना चोरीचा प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
महाद्वार रोड परिसरात कचरावाहू वाहन नियमितपणे येत नसल्याने महापालिकेच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता वाहनाची बॅटरी चोरी झाली असल्याचे सांगण्यात आले. सदाशिवनगर येथील गॅरेजमध्ये पार्क केलेल्या वाहनाची बॅटरी चोरी कशी झाली, असा मुद्दा उपस्थित झाला असून, चोरी प्रकरणाची चौकशी आयुक्तांनी करावी, अशी मागणी होत आहे.
घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यात येतो. मात्र महाद्वार रोड परिसरात मागील 15 दिवसांपासून कचरावाहू वाहन नियमितपणे येत नसल्याने कचरा टाकण्याची समस्या निर्माण झाली आहे. सध्या दुसरे वाहन येत असल्याने महाद्वार रोड परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱयांना याबाबतचा जाब विचारला. महापालिकेच्या वाहनाची बॅटरी चोरण्यात आल्याने कचरावाहू वाहन बंद असल्याचे सांगण्यात आले. सदर वाहन सदाशिवनगर स्मशानभूमी परिसरात पार्क करण्यात येते. त्या ठिकाणी महापालिकेने दोन वॉचमन नियुक्त केले आहेत. तरीदेखील कचरावाहू वाहनाची बॅटरी चोरी झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी देखील सदाशिवनगर स्मशानभूमीत पार्क करण्यात आलेल्या वाहनांची बॅटरी चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. त्यामुळे हा प्रकार पुन्हा सुरू झाल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. तसेच वॉचमन असताना बॅटरीची चोरी कशी झाली, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
स्मशानभूमी शेजारी महापालिकेच्या वाहनांचे गॅरेज आहे. त्यामुळे सर्व वाहने या ठिकाणी पार्क करण्यात येतात. या ठिकाणाहून वाहनांच्या साहित्याची चोरी झाल्यास मनपाला आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्मयता आहे. त्यामुळे चोरी प्रकरणाची चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच महाद्वार रोड परिसरातील कचऱयाची उचल करण्यासाठी कचरावाहू वाहन नियमितपणे पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.