पालिकेचा आरोग्य विभागाकडून उपाययोजनाच नाहीत
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील कचरा उचलताना काही नियम दिले आहेत. मात्र, हे नियम डावलून केंणतेही सुरक्षा साधन न वापरता हे कर्मचारी कचरा उचलत आहेत. ज्या दोन कंपन्यांकडे सध्या शहरातील कचरा गोळा करण्याचे टेंडर आहे. त्यांच्याकडून नियमाना डावलून काम होत आहे. पालिकेतील बिगाऱयांचे तिसऱया दिवशी आंदोलन सुरुच होते. यामुळे शहरात कचऱयांची समस्या बिकट बनली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी म्हणून त्यांना यावर काहीच तोडगा काढायला जमत नाही.
शहरात कचरा गोळा करण्यासाठी 40 घंटागाडया आहेत. या चाळीस घंटागाडया ह्या पालिकेच्या असल्या तरीही घंटा ज्या दोन कंपन्यां चालवतात त्यांच्याकडून शहरात काही ठिकाणी ट्रक्टरमब्धून कचरा गोळा केला जातो. हा कचरा गोळा करताना अनेक त्रुटी राहिलेल्या असून ट्रक्टरमधून जो कचरा गोळा केला जातो. कचरा गोळा करताना जे निकष आहेत, ज्या प्रमाणे करार झाला आहे. त्याला छेद देत आरोग्याच्या घंटागाडीच्या ठेकेदारांकडून असेतसेच काम करुन दिली जाते.ट्रक्टरमधून कचरा गोळाकरुन नियमांना तिलंजली दिली जात आहे. उघडय़ावरुन कचरा गोळा करताना तसाच भरुन टाकण्यात येंत आहे. करारातील नियम पायदळी तुडवले जात आहेत.
बिगाऱयांचे आंदोलन सुरुच
सातारा पालिकेत आरोग्य विभागाच्या बिगाऱयांना गेल्या पाच महिन्यासून पगार दिला गेला नाही. त्यामुळे शहरात जागोजागी कचराच कचरा दिसू लागला आहे. आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
ऍटो सॅनिटायझर मशिनमध्ये सॅनिटायझरच नाही
पालिकेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला असलेले सॅनिटायझर मशिन रिकामी वाटू लागली आहे. इमारतीत येणाऱया नागरिकांची नेंदणी करण्यात येते. मात्र, सोमवारी ही नोंदणीची वही बाजुलला तर कर्मचारी तिसरीकडेच. सॅनियाझरच्या मशिनमध्ये सानियाझरच नसल्याचे नाराजी व्यक्त केली.