प्रतिनिधी/ सातारा
शहरातील गोळा करून टाकला जाणार कचरा सोनगाव येथील कचरा डेपोत टाकला जातो.या कचरा डेपोतल्या कच्रयाला आज दुपारी 12 वाजता आग लागल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच सातारा पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन अग्निशमन बंबासह ही लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.या आगीमुळे लगतच्या गावांना दरवर्षी त्रास होत असतो.
दरवर्षी उन्हाळ्यात सोनगाव कचरा डेपोतील कच्रयाला आग लागण्याच्या घटना घडत असतात.सुमारे 6 टन कचरा शहरातून गोळा करून टाकण्यात येतो.नव्याने प्रकल्प उभारण्यात आला असला तरीही अजून जुना कचरा तसाच टाकलेला आहे.नव्या कच्रयावर प्रक्रिया केली जात असल्याचे पालिका सांगते आहे.आज दुपारी 12 वाजता कच्रयाने पेट घेतला.याची माहिती पालिका प्रशासनास मिळताच प्रशासनच्यावतीने पालिकेचा अग्निशमन विभाग ही आग आटोक्यात आणण्याच्या कामाला लागला.दोन अग्निशमन दलाचे बंब आणि अग्निशमन अधिकारी, कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.