प्रतिनिधी / बेळगाव
अंगडी तांत्रिक व व्यवस्थापन महाविद्यालयात इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर अखिल भारतीय तांत्रिक महामंडळाच्या सहकार्याने झालेल्या कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. ऑनलाईनवरून प्रमुख पाहुणे या नात्याने तांत्रिक मंडळाचे संचालक कर्नल व्यंकट यांनी अशा कार्यशाळांची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे प्राध्यापकांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कचरा व्यवस्थापनाबद्दलही माहिती देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
निमंत्रित वक्ते म्हणून उपस्थित असलेले गंगूर फौंडेशनचे संचालक रमेश गंगूर यांनी, आज प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवर ताण वाढतो आहे. मात्र योगाभ्यासाने तो कमी करता येतो. आपल्या कामावर श्रद्धा ठेवा. योग, व्यायाम आणि प्राणायाम यांचा सराव करावा, असे आवाहन केले.
अध्यक्ष संजय पुजारी यांचेही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण झाले. संयोजन अधिकारी डॉ. सुरेश बाबू यांनी कार्यशाळेची माहिती दिली.
यावेळी प्रा. अरविंद जाधव, डॉ. बसव्वा रेड्डी, डॉ. किरण पोतदार, डॉ. राजेंद इनामदार, प्रा. सागर बिर्जे, प्रा. वसंत उपाध्ये, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. विनायक आदीमळे, प्रा. रविराज चौगुले आदी मान्यवर उपस्थित
होते. प्रा. एम. बी. कंठी यांनी स्वागत केले. प्रा. विनोद सुळेभावी व प्रा. तेजस्विनी जोथावर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवि तिळगंजी यांनी आभार मानले.