दुमाणे प्रकल्पातील कचऱयावर आवरण घालावे : सरपंचाची मागणी
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण नगरपालिकेच्या दुमाणे कचरा प्रकल्पामधून जो कुजलेला कचरा आणि सांडपाणी आगोंद नदीत सोडले जाते त्या प्रकाराची गंभीर दखल आगोंद पंचायतीचे सरपंच बादल ना. गावकर यांनी घेतली असून काणकोण पालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करतानाच या ठिकाणी साठलेल्या कचऱयावर आवरण घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पालिका क्षेत्रातून गोळा केला जाणारा ओला आणि सुका कचरा दुमाणे या ठिकाणी साठवून ठेवला जातो. दरवर्षी पावसाळय़ात या ठिकाणी झरे पाझरतात व या पाण्यात कुजलेला कचरा वाहून जाऊन जवळच्या नदीच्या पाण्यात मिसळत असतो. याची पूर्वकल्पना असताना केवळ दोनच जागा प्लास्टिकच्या आवरणाने झाकण्यात आलेल्या आहेत. बाकीचे ढिगारे खुले असून त्याचा परिणाम मात्र आगोंदवासियांना भोगावा लागत असल्याचे मत सरपंच गावकर यांनी व्यक्त केले आहे.
पालिका अधिकाऱयांना पाहणीची सूचना : फर्नांडिस
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हरित लवादाने देखील याची दखल मागच्या वर्षी घेतली होती. याचा परिणाम आगोंद परिसरातील पिण्याचे पाणी आणि भातशेतीवर होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याकडे देखील याबाबतीत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. या प्रकल्पातून सध्या जे दू†िषत पाणी मोकळय़ा वातावरणात सोडले जाते त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करतानाच या प्रकाराची त्वरित पाहणी करण्याची सूचना आपण पालिका अधिकाऱयांना दिलेली आहे, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.
हरित लवादाकडे धाव घेणार ः जॅक फर्नांडिस काणकोणच्या गोंयकार या बिगरसरकारी संघटनेने यापूर्वी दुमाणे कचरा प्रकल्पाच्या सुधारणेसाठी बऱयाच वेळा सहकार्य केलेले आहे. या ठिकाणी ओल्या आणि सुक्या कचऱयाचे वर्गीकरण करून त्याच्यावर प्रक्रिया करण्यासंबंधी सहकार्य करताना कित्येक टन सुका कचरा स्वीकारून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम या संघटनेने केलेले आहे. मात्र काणकोण पालिकेला आता या प्रकाराची सवय झालेली असून सध्या जो प्रकार या ठिकाणी चालू आहे त्यासंबंधी राष्ट्रीय हरित लवादाकडे संपर्क साधून त्यांच्याकडे अहवाल सादर केला जाईल, असे या संघटनेचे प्रमुख जॅक फर्नांडिस यांनी स्पष्ट केले आहे.