तीन कोटी बॅरल कच्चे तेल पुरविणार : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घोषणा
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियावर अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सध्याच कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचली आहे. अमेरिकन प्रशासनाने इतर 30 देशांसह ‘यूएस स्ट्रटेजिक रिझर्व्ह’मधून लाखो बॅरल तेल पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेमुळे भारतासह अनेक आयातदार देशांना इंधन दरवाढीच्या भडक्यापासून दिलासा मिळू शकतो.
रशिया आणि युपेनमधील युद्ध थाबंले नाही तर कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढू शकतात. त्यामुळे भारतासह कच्च्या तेलाची आयात करणाऱया देशांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची शक्मयता आहे. परंतु, जागतिक पातळीवरील बिकट परिस्थिती लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. रशियाने दुसऱया देशावर हल्ला केल्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. परंतु, अमेरिकेने इतर 30 देशांसह जगभरातील तेल साठय़ांतून 3 कोटी बॅरल तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका या उपक्रमाचे नेतृत्व करेल. आम्ही आमच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठय़ातून तीन कोटी बॅरल तेल पुरविणार आहोत. गरज भासल्यास आणखी कच्चे तेल उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती जो बायडेन यांनी दिली आहे.
रशिया कच्च्या तेलाचा निर्यातदार
जगभरातील तेल उत्पादक देशांपैकी रशिया हा तेलाचे उत्पादन करणारा देश आहे. रशिया युरोपला 35 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा करतो. भारतही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे दोन्ही देशांतील युद्ध थांबले नाही तर कच्च्या तेलाच्या पुरवठय़ात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. हा अडथळा निर्माण झाला तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.
रशियाच्या निर्णयांवर अमेरिकेचे लक्ष
अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम व्हावा यासाठी त्यांचे प्रशासन कठोर पावले उचलत आहे. याबरोबरच अमेरिकन व्यवसाय आणि ग्राहकांच्या संरक्षणासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन बायडेन यांनी दिले आहे. तसेच मी अमेरिकेच्या नागरिकांसोबत कायम प्रामाणिक राहणार असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.