नवी दिल्ली
देशातील कच्च्या स्टीलचे उत्पादन ऑगस्ट 2020मधील काळात 4 टक्क्मयांपेक्षा अधिकने घटून 84.78 लाख टनावर राहिले आहे, अशी माहिती जागतिक उद्योग संघ वर्ल्ड स्टील असोसिएशन (वर्ल्डस्टील) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात दिली आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीत देशात 88.69 लाख टन कच्च्या स्टीलचे उत्पादन झाल्याची नोंद केली होती.
सध्याच्या माहितीनुसार जागतिक पातळीवरील स्टील उत्पादनात सुधारणा होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये 64 देशातील कच्च्या स्टीलचे उत्पादन मागील महिन्यात 0.6 टक्क्यांनी वधारुन 15.6244 कोटी टनावर राहिले आहे. परंतु कोरोनाच्या महामारीशी संबंधीत असणाऱया कारणामुळे ऑगस्टमधील आकडेवारीवर संशोधन होण्याचे संकेत आहेत.