स्थानकातील कर्मचारी, अधिकाऱयांना ग्रामस्थांच्या शुभेच्छा
वार्ताहर/ संगमेश्वर
तालुक्यातील कडवई रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण झाले असून मंगळवार 16 फेब्रुवारीला सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून स्टेशन मास्तर व इतर कर्मचारी कार्यरत झाले आहेत.
पॅसेंजर ट्रेन या थांब्यावर थांबणार असून कडवईवासीयांची स्थानकाची प्रतीक्षा संपली आहे. बुधवारपासून क्रॉसिंगसाठी येथे रेल्वे थांबणार आहेत. नऊ वर्षाच्या प्रदीर्घ लढय़ानंतर या स्थानकाचे काम 16 फेब्रुवारी 2021 रोजी खऱया अर्थाने पूर्णत्वाला गेले. कडवई ग्रामस्थांची स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. मंगळवारी उपस्थित कर्मचारी व अधिकाऱयांना मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या व रेल्वे प्रशासनाचे आभार मानण्यात आले. जितेंद्र चव्हाण यांच्यासह सदानंद ब्रीद, रामचंद्र किंजलकर, रघुनाथ येलोंढे, कृष्णा पाचकले, प्रकाश नवले, बंडय़ा मयेकर, मनसेचे उपतालुकाध्यक्ष नंदकुमार फडकले, उपविभागाध्यक्ष शांताराम दहिवळकर, मोहन कुंभार, चंद्रकांत मिरगल, विजय उजगावकर आदी उपस्थित होते.