कडेगाव/ प्रतिनिधी
कडेगाव, कडेपूर, नेलीँ या प्रमुख तीन गावांना पिणाच्या पाण्यासाठी कडेगाव तलावाचा उपयोग शंभर टक्के उपयोग होतो. याबरोबरच कडेगाव व नेलीँ या दोन्ही गावातील काही भागातील शेतीच्या पाण्यासाठीही कडेगाव तलावाचा उपयोग होत असतो. सध्या तलावात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कडेगाव तलावात सध्या धगधगत्या उन्हाने पाणी पातळी खालावत असून पाणीसाठा ३८ टक्के असल्याची माहिती टेंभूचे इंजिनिअर अर्जुन राठोड यांनी दिली दैनिक तरुण भारतशी बोलताना दिली.
कडेगाव तलावात सध्या ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सदर पाणीसाठा हा एक महिना पुरणार असून अजून टेंभूचे उपसा सिंचन योजनेचे शिवाजीनगर तलावातून पाणी उपसा करून कडेगाव तलावात तिसरे आवर्तन मे महिन्यात सोडणार असून पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कडेगाव शहरात पिण्याच्या पाण्यासाठी कडेगाव तलाव, साकळीचा आड, दशलक्ष विहरीवरून पिण्याच्या पाण्याची कडेगाव शहरातील लोकांची तहान भागवली जात आहे. कडेगाव शहरात सध्या यावषीँ जरा पिण्याचे शुद्ध पाणी लोकांना मिळत आहे. सध्या पिण्यासाठी रोज पाणी शुद्ध येत असून प्रत्येक विभागात एक तास पाणी सोडले जाते आहे. सध्या हात धुण्यासाठी व स्वच्छतेसाठी व पिण्यासाठी पाणी पुरेसे असून नगरपंचायत याबाबतीत काळजी घेत आहे. यावषीँ पाऊसमान वेळेवर पडेल असा हवामान खात्याचा अंदाज असून आणि समजा जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली तर तलावातील पाणी पातळी त्यावेळी खाली गेलीतर टेंभूचे योजनेचे चौथे व पाचवे आवर्तन सोडणे गरज निर्माण होणार आहे. सध्या कडेगाव तलावाच्या कॅनॉल व काही दिवसांनी ओढयास पाणी सोडावे लागणार आहे.आता पर्यंत शेती व पिण्याच्या पाण्याची आर्वतणे वेळेवर सोडण्यात आली आहेत.
सध्या काही दिवसातच मे महिन्यास सुरुवात होणार आहे. या महिन्यात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज निर्माण होते.त्या बरोबरच पिण्याच्या पाण्याचीही मागणी वाढत असते. एकदंरीत संपूर्ण मे महिना व जून महिन्यांचा पंधरावडा यामध्ये टेंभूची आर्वतणे शेतकरी यांना वेळेवर व मुबलक पाणी योग्य नियोजन करून मिळाले तर शेतकरी व नागरिक यांना आंदोलने करण्याची वेळ येणार नाही. पाणी वेळेवर मिळाले नाहीतर सामाजिक कार्यकर्ते डि.एस.देशमुख (बापू) व अभिमन्यू वरूडे यांनी लोकशाहीचा मार्गाने, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून वेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात येईल.असा इशारा दैनिक तरुण भारतशी बोलताना दिला.