कडेगांव/प्रतिनिधी
कडेगांव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी 28 फेब्रुवारी झाल्यानंतर शुक्रवार दि. ४ मार्च रोजी नगरपंचायतीच्या बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण सभापती आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी पार पडल्या.
नगरपंचायती मध्ये भारतीय जनता पार्टीचे ११ नगरसेवक, तर काँग्रेसचे ५ व राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे. सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी. भाजपच्या नगरसेविका, नजमाबी हसन पठाण, महिला व बालकल्याण सभापती पदी नगरसेविका मनिशा राजपूत, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती पदी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, आरोग्य सभापती पदी नगरसेवक निलेश लंगडे, महीला व बालकल्याण उपसभापती नगरसेविका रंजना लोखंडे यांची निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीच्या स्वीकृत नगरसेवकपदी श्रीमंत शिंदे यांची तर काँग्रेसने राष्ट्रवादी चा एक नगरसेवक सोबत घेतल्यामुळे काँग्रेस कडून सिद्धीक आशरफ पठाण यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली.
या निवडीचे पीठासन अधिकारी कडेगाव पलूस चे प्रांताधिकारी गणेश मरकड तर सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून कडेगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप होते.
यानिवड प्रक्रियेवेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, नगरसेवक निलेश लंगडे, अमोल डांगे, काँग्रेसचे गटनेते विजय शिंदे आदी उपस्थित होते.