प्रतिनिधी / सांगली
नेर्ली तालुका कडेगाव येथील 57 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना मधुमेह होता. सदर व्यक्ती 18 मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज आखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.