प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / कडेगांव
कडेगाव व पलूस तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नऊ जणांना सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती कडेगाव पलूसचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार मा.जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार.दि. 22.12.2021.पासून ही कारवाई होणार आहे.
कडेगाव पलूस तालुक्यातील चंद्रकांत उर्फ पिंटू बाळे राकडे.रा.रामानंदनगर ता. पलूस, सागर नामदेव एवळे रा. दुधोंडी, ता.पलूस कृष्णा शिवाजी येसुगडे. रा.पलूस,ता. पलूस,सचिन भगवान जाधव रा. रामानंदनगर. ता.पलूस, रोहित नवाजी सदामते रा.पलूस.ता.पलूस,राहुल संपतराव नलवडे रा.दुधोंडी.ता.पलूस राकेश उर्फ अक्षय मनोहर आवळे रा.दुधोंडी. ता.पलूस यांना सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यातून हद्दपार केले.
तसेच कडेगाव मधील निलेश उर्फ गुंड्या मनोज शिंदे.रा.कडेगाव, सुरेश रामा मोहिते रा.कडेगाव, यांना सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी दिली