कडेगाव गणेशनगर येथील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोना
प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव गणेशनगर येथील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ते मुंबई ठाणे येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून मंगळवारी (ता.30) रोजी ठाणे येथून कडेगाव येथे आले होते. शुक्रवारी (ता.3) रोजी आरोग्य विभागाने त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतले होते.त्याचा रिपोर्ट आज दुपारी दोन वाजता आला, त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.