प्रतिनिधी/ बेळगाव
कडोली गावचे सुपुत्र व राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी अभिजित मोहन पाटील याने कर्नाटक राज्य महाविद्यालय पात्रता परीक्षेत (के-सेट) राज्यशास्त्र विषयात यश मिळविले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
अभिजितचे प्राथमिक शिक्षण कडोली येथील सरकारी मराठी मॉडेल स्कूल तर माध्यमिक शिक्षण मराठी विद्यानिकेतन येथे झाले. पदवीपूर्व शिक्षण राजा लखमगौडा महाविद्यालयात तर भाऊराव काकतकर महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी संपादन केली. राणी चन्नम्मा विद्यापीठातून त्याने एम. ए. पदवी गुणवत्तेसह प्राप्त केली. कडोली परिसरात के-सेट उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळविला आहे. कडोली सरकारी मराठी मॉडेल स्कूलचे सहशिक्षक एम. आर. पाटील यांचा तो सुपुत्र आहे.