वार्ताहर/ कडोली
कडोली येथे कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावात सतर्कता बाळगण्यात आली असून रुग्ण सापडलेल्या परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
जगभरासह देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असून यामुळे संपूर्ण जनतेत खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाने आतापर्यंत कडोली गावात शिरकाव केला नव्हता. त्यामुळे गावकऱयांनी धसका घेतला नव्हता. पण आता रविवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने गावात भीती निर्माण झाली असून खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. शिवाय ग्रा.पं.ने रुग्ण आढळलेल्या परिसरात सॅनिटायझरची फवारणी केली आहे.