वार्ताहर/ कडोली
येथील मराठी साहित्य संघातर्फे रविवार दि. 10 जानेवारी रोजी होणाऱया 36 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बेळगावच्या साहित्यिका प्रा. माधुरी शानभाग यांची निवड झाली आहे.
जाफरवाडी-कडोली मार्गावरील बसवाण्णानगर येथील छत्रू महाराज भवन येथे हे संमेलन होणार आहे. सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ व त्यानंतर प्रा. माधुरी शानभाग यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱया सत्रात कविसंमेलन होणार आहे.