सावंतवाडी / प्रतिनिधी-
कणकवली येथे अपघातात बोलेरो आणि कार यांच्यात शनिवारी झालेल्या अपघातात जखमी कारचालक तथा कोलगाव येथील सातेरी आॅटो मोबाईलचे मालक संतोष धोंडी पालकर ३७ यांचे गोवा बांबुळी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पत्नी समिक्षा अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर गोव्यात उपचार सुरु आहेत. मुळ वेतोरे येथील असलेले पालकर यांचे कोलगावला दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. पालकर पत्नी , दोन ुलांसह शनिवारी फोंडाघाट येथे कारने सासरवाडीला जात होते. कणकवली जानवली पुलाला लागुन असलेल्या कलमठ ब्रिजवर कार आणि बोलेरो यांच्यात अपघात झाला. त्यात संताेष पालकर, त्यांची पत्नी समिक्षा मुलगी गुंजन, मुलगा विहान जखमी झाले होते.संतोष पालकर , पत्नी समिक्षा यांना उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आले होते. पालकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परीवार आहे.. पालकर मनमिळावु स्वभावाचे होते. त्याच्या निधनाबददल हळहळ व्यक्त हेत आहे.