आठवड्यातील दुसरी घटना
कणकवली /प्रतिनिधी-
कणकवली – कळसुली जाणाऱ्या एसटी वर बुधवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताकडून दगडफेक केल्याची घटना घडली. कणकवली पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर हळवल घाटी येथे ही घटना घडल्याचे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
कणकवली आगारातून सकाळी 07. 30 वाजता एमएच 20 बीएल 4082 एसटी कळसुलीकडे जात असताना हळवल घाटी येथे या एसटीवर अज्ञाताने समोरील काचेवर दगडफेक करत तो पसार झाला. यावेळी तीन प्रवासी प्रवास करत होते. मात्र यात कुठल्याही प्रवासी किंवा चालक वाहकास दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. सदरची बस चालक म्हणून एस. ए. चव्हाण व वाहक म्हणून आर. पी. लोकरे हे कार्यरत होते. घटनेनंतर यासंदर्भात कणकवली पोलिसात तक्रार नोंदविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती.ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.