कनेडी / वार्ताहर–
कणकवली पं. स. सदस्य तथा माजी उपसभापती सुभाष महादेव सावंत (५५ नरडवे-पिंपळवाडी) यांचे सोमवारी दुपारी दुःखद निधन झाले. गावच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कायम सहभाग असे. कट्टर राणे समर्थक असलेल्या सुभाष सावंत यांनी ९८-९९ साली नरडवे गावचे सरपंच म्हणून यशस्वी कामगिरी केली. त्याची पोचपावती म्हणून नारायण राणे यांनी त्यांना पं. स. ची उमेदवारी दिली. तेव्हा ते भरघोस मतांनी निवडून आले.
२६ ऑगस्ट २००३ ते ९ फेब्रवारी २००५ पर्यंत त्यांनी कणकवली प. स.चे उप सभापती म्हणून यशस्वी कामगिरी केली.२०१७ साली झालेल्या प.स. च्या निवडणुकीवेळी नरडवे प. स. मतदार संघातून त्यांना पुन्हा नारायण राणे यांनी उमेदवारी दिली व ते निवडून आले. त्यांच्या निधनाने नरडवे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, चुलत भाऊ असा परिवार आहे.