कणकवली / प्रतिनिधी-
येथील बस स्थानकावर काम बंद आंदोलनात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगावर विभाग नियंत्रकांच्या चालकाने गाडी घालण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच संबंधित चालकाने माफी न मागितल्यास पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. विभाग नियंत्रकांच्या चालकाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ केल्याने कर्मचारीही आक्रमक झाले होते. तसेच संतप्त कर्मचारी बसस्थानकावर एकत्र झाले होते. यावेळी संपकरी कर्मचारी गणेश शिरकर, बालाजी गुट्टे, बालाजी मुंडे, श्री. मुळे ,श्री. नेरकर, श्री. पवार, श्री. मोरे, श्री. सामंत, प्रकाश वालावलकर, श्री. परब, श्री. केंद्रे, श्री. माने, मसुरकर, श्री. दळवी, हांडे, जाधव, वाळके व इतर कर्मचारी उपस्थित होते.