कणकवली/प्रतिनिधी-
कणकवली शहरातील गौरव प्रकाश सरुडकर (28) या युवकाने हर्णेआळी येथील सापळे सव्हिसिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या शिगेला गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. गौरव याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, भाऊ, चुलते, चुलती असा परिवार आहे.