प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात बेकायदा दारू वाहतूक थोपविण्यासाठी अबकारी विभागाने आपली मोहीम तीव्र केली आहे. शुक्रवारी सकाळी कणकुंबीजवळ बेळगाव येथील दोघा जणांना अटक करून गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.
महिंद्रा गुड्स वाहनातून दारू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच अबकारी अधिकारी मंजुनाथ गलगली, एच. एफ. निंगरेड्डी व त्यांच्या सहकाऱयांनी वाहन अडवून तपासणी केली असता या वाहनात 41.25 लिटर गोवा बनावटीची दारू आढळून आली
या प्रकरणी किशोर धारवाड (वय 26), बसवराज तळवार (वय 26) दोघेही रा. बेळगाव यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाची किंमत वाहनासह 5 लाख 14 हजार रुपये इतकी आहे.