अबकारी विभागाची चार दिवसांतील दुसरी कारवाई
गोव्याहून बेकायदा दारु वाहतूक करणाऱया दोघा जणांना बुधवारी पहाटे अबकारी अधिकाऱयांनी कणकुंबीजवळ अटक केली आहे. त्यांच्या जवळून वाहनांसह 11 लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला असून अबकारी विभागाने चार दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.
राम कचरु करांडे (वय 26, रा. तोरटवाडी, जि. बीड), किरण कचरु करांडे (वय 23, रा. तोरटवाडी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. एमएच 12, एफझेड 7164 क्रमांकाच्या टाटा गुडस् वाहनांतून महाराष्ट्रात बेकायदा दारु नेताना ही कारवाई करण्यात आली आहे.