प्रतिनिधी /बेळगाव
कणबर्गी परिसरात मराठा समाज स्मशानभूमीकडे व शेतीकडे जाणाऱया मंडीमार्गाची समस्या निर्माण झाली होती. अखेर या रस्त्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात आला असून, हिंडाल्को कंपनीच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने हा रस्ता व्यवस्थित करण्यात आला.
त्या रस्त्याचे काम सुरू करताना माजी नगरसेवक भैरगौडा पाटील, संजू करडी, बाबाजी यल्लाप्पा करडी, काडाप्पा भरमशेट्टी, पुंडलिक मालाई, बाबू कडोलकर, राचय्या पाटील, रवी पाटील तसेच कणबर्गी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.