जय हनुमान कुस्ती संघटनेच्या बैठकीत निर्णय
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कणबर्गी येथे जय हनुमान कुस्तीगिर संघटनेतर्फे हनुमान जयंतीनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन सोमवार दि. 18 एप्रिल रोजी कणबर्गी येथे करण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
कणबर्गीत प्रतिवषी जॉर्जिया, दिल्ली, हरियाना, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश येथील बलाढय़ मल्लांना बोलावून मैदान घेण्यात येते. कणबर्गीचे आराध्य दैवत सिद्धेश्वर देवस्थान यांच्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धा दरवषी भरविल्या जातात. कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेली दोन वर्षे मैदान रद्द करण्यात आले होते. पण यावषी स्पर्धा मोठय़ा प्रमाणात भरविण्याचे ठरविण्यात आले.
या वषीच्या मैदानात जॉर्जिया, हरियाना, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकातील मल्लांच्या प्रमुख कुस्त्या भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर व संजय सुंठकर, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष गणपत बन्नोशी, उपाध्यक्ष सिद्राय नाईक व संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यातm आला.
सदर मैदान जय हनुमान कुस्ती संघटनेच्या आखाडय़ात भरविण्यात येणार असून, या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
यावेळी कृष्णा पाटील, फकिरा कंग्राळकर, शंकर मुचंडीकर, पुंडलीक अष्टेकर, धोंडिबा मुतकेकर, प्रकाश मुचंडीकर, जोतिबा काकतीकर, मारूती मालाई, परशराम मुचंडीकर, लक्ष्मण मालाई, निंगाप्पा मुचंडीकर, नारायण गोवेकर आदी सभासद उपस्थित होते.