वार्ताहर/ सांबरा
कणबर्गी परिसरात बुधवारपासून धूळवाफ पेरणीला जोरदार प्रारंभ करण्यात आला आहे.
कणबर्गी परिसरात यापूर्वी एक दोन चांगले वळीवाचे पाऊस झाले होते. त्यामुळे शेतकऱयांनी मशागतीची कामे वेळेवर आटोपून घेतली. बुधवारी प्रारंभी कुरीचे पूजन करून भातपेरणीस प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे शिवारात शेतकऱयांची दिवसभर भातपेरणीसाठी लागबग दिसून येत होती. यंदा पाऊस चांगला होईल या आशेवर शेतकऱयांनी भातपेरणीस प्रारंभ केला आहे. या भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. कणबर्गीसह कलखांब, मुचंडी, अष्टे भागातही तुरळक प्रमाणात भातपेरणीला प्रारंभ करण्यात आला आहे.