प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी गावच्या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे सदस्य व डॉ. रवि व्ही. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात आला. बेलपत्र, आपटा, चाफा, नागलिंग पुष्प यासारख्या विविध रोपे लावण्यात आली.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, विरेश हिरेमठ, राघवेंद्र पाटील, मल्लाप्पा हिडदुग्गी, संजय इनामदार, कल्लाप्पा शर्मनट्टी, कुशाल सुंठकर, महेश मुचंडीकर, भरमानी मालाई, बाळू जाधव, बसू शर्मनट्टी, प्रकाश मुचंडीकर, संजु गुरनट्टी, सिद्दाप्पा पुजारी, किसन सुंठकर, यल्लाप्पा बुडरी यासह इतर सदस्य उपस्थित होते.