प्रतिनिधी / सांगली
प्रभाग क्र. १६ मधील अनेक गल्यातील असलेल्या ड्रेनेजच्या पाईपलाईन अत्यंत जुन्या व खराब झालेल्या आहेत. पाठपुरावा करून या पाईपलाईन बदलण्याचे काम चालू आहे. कणसे गल्ली येथील पाण्याची पाईपलाईन ही पूर्ण खराब झाली असून ती बदलणे गरजेचे होते, लोकांना त्यामुळे ड्रेनेजचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
कणसे गल्लीतील रहिवाशांच्या मागणीवरून कामाला सुरुवात झाली. याचा कामाचा शुभारंभ प्रभागाच्या नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेविका सुनंदाराऊत आणि या भागातील नागरिकांच्या उपस्थितीत झाला.