प्रतिनिधी /सांगे
सांगेतील वालकिणी वसाहत क्रमांक 3 येथील श्री कणेरीसिद्ध आवण देवाचा 15 वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार 8 रोजी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 9 वा. श्रींस अभिषेक व देवकृत्यास आरंभ, पूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महानैवेद्य, तर संध्या. 7.30 वा. विविधा सादर करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी तीर्थप्रसाद आणि महानैवेद्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानने केले आहे.