वृत्तसंस्था/ अबु धाबी
कतारचा अव्वल पुरूष धावपटू 24 वर्षीय अबदालेलाह हारूणचे शनिवारी मोटार दुर्घटनेत निधन झाले. सदर माहिती कतार ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष खलीफा अल थानी यांनी आपल्या ट्विटरवर दिली आहे.ं
कतारचा धावपटू हारूण याने 2017 साली झालेल्या विश्व़ ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 400 मी. धावण्यांच्या शर्यतीत कास्यपदक मिळविले होते. जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत तो कतारचे प्रतिनिधीत्व करणार होता.