वृत्तसंस्था/ दोहा
2022 साली होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद कतार भूषवित आहे. या स्पर्धेसाठी कतारने अद्ययावत सुविधा उपलब्ध करत आधुनिक फुटबॉल स्टेडियम्स सुसज्ज करीत आहे. आतापर्यंत कतारने तीन स्टेडियम्सचे बांधकाम पूर्ण केले आहे.
या जागतिक स्पर्धेला अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. कतारमध्ये या स्पर्धेसाठी अनेक स्टेडियम्सची उभारणी करण्याचे ठरविले आहे. यजमान कतारने एज्युकेशन सिटी स्टेडियमचे बांधकाम पूर्ण केले असून या नव्या स्टेडियममध्ये आगामी स्पर्धेतील उपांत्यफेरीचा सामना खेळविला जाणार आहे. या स्टेडियममध्ये 40 हजार शौकिनांची क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्टेडियमच्या बांधकामासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागला. आणखी पाच नव्या स्टेडियम्सचे बांधकाम चालू आहे.