प्रतिनिधी / बेळगाव
कतार (दुबई) येथील कर्नाटक संघाने जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन कल्चर सेंटरचे अध्यक्ष बाबुरंजन व व्यवस्थापन क्षेत्रातील हेमचंद्रन उपस्थित होते. याशिवाय तुळुकोट्टा, बंडस व अन्य समाजाचे भारतीय नागरिक यावेळी उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करून वृक्षारोपण केले. संघाच्या सरचिटणीसांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी प्रामुख्याने नीम, आंबा आणि अन्य जातीची रोपे लावण्यात आली. त्यानंतर झालेल्या छोटय़ाशा कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी पर्यावरण आणि पर्यावरण दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. संघाचे पर्यावरण सचिव कुमारस्वामी यांनी आभार मानले.
कतार येथील गल्फार अल् मिसनाड व अल् मुफ्ता यांनी या कार्यक्रमासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली. इंडियन कल्चर सेंटरचे उपाध्यक्ष सुब्रमण्यम् हेब्बगेळू यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.