वास्को
कतारहून 279 प्रवाशांना घेऊन गोव्याकडे प्रयाण केलेले विमान काल शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झाले. य्ािं प्रवाशांमध्ये 267 गोमंतकीय असून 16 प्रवासी बेंगळूरचे 56 मुंबईचे, 78 चेन्नई, 40 केरळ व 22 हैद्राबादातील आहेत. ऱे भारतीय प्रवासी कतारमध्ये अडकले होते.
कतारहून क्यूआर 7483 हे विमान दाबोळी विमानतळावर दाखल होताच, पहाटेच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कदंबच्या बसमधून क्वारंटाईनसाठी पाठवण्यात आले. 279 प्रवाशांपैकी गोव्यातील 67 प्रवाशांमधिल 43 प्रवाशांना कोलवा येथील किनारा हॉटेलमध्ये तर 24 प्रवाशांना पणजी येथील हॉटेल डबल ट्री येथे क्वारंटाईनसाठी रवाना करण्यात आले. थर इतर राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात कदंब बसमधून क्वारंटाईनसाठी रवाना करण्यात आले.
शुक्रवारी दाबोळी विमानतळावर 182 प्रवासी दाखल
देशांतर्गंत हवाई प्रवासात काल शुक्रवारी दाबोळी विमानतळावर 182 हवाई प्रवासी उतरले. दुपारच्या वेळी तीन तर सायंकाळी एका विमानाचे आगमन झाले. परतीच्या प्रवासात चार विमानांतून 339 प्रवाशांनी हैंद्राबाद, बेंगळूर, दिल्ली व म्हैसुरला जाण्यासाठी उड्डाण केले.
काल शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे विमान 24 प्रवाशांसह हैद्राबादहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून दुपारी दोनच्या सुमारास 87 प्रवाशांनी हैद्राबादला प्रयाण केले. दुपारी 1 च्या सुमारास बेंगळूरहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 55 प्रवाशांसह दाखल झाले. हेच विमान 2.15 वा. 120 प्रवाशांसह बेंगळूरकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दिल्लीहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 93 प्रवाशांसह दाखल झाले. याच विमानातून 126 प्रवाशांनी दिल्लीकडे प्रयाण केले. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास म्हैसुरहून एअर इंडियाचे विमान केवळ 10 प्रवाशांसह दाखल झाले. याच विमानातून सायंकाळी 7 वा. केवळ 6 प्रवाशांनी म्हैसुरकडे उड्डाण केले.
काल एकूण 182 प्रवासी गोव्यात हवाईमार्गे दाखल झाले. तर एकूण 339 प्रवाशांनी हैद्राबाद, बेंगळूर, दिल्ली व म्हैसुरकडे उड्डाण केले.