वार्ताहर /सावईवेरे
गोवा प्रदेश सानेगुरुजी कथामालातर्फे माशेल केंद्र आयोजित सानेगुरुजी विद्यार्थी मराठी कथाकथन स्पर्धेतील प्राथमिक गटात वळवई सावईवेरे येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
आर्या गीतेश वेरेकर ही माशेल केंद्रात प्रथम तर आयुषी मिलिंद वेरेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. माशेल केंद्रातून प्राथमिक गटात एकूण 51 मुलांनी भाग घेतला होता. आर्या वेरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने तिची राज्य पातळीवरील स्पर्धेत निवड झाली आहे. या यशाबद्दल शाळेच्या प्रमुख शर्मिला अभिषेकी व सर्व शिक्षक वर्गातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.