वार्ताहर /पणजी
गोव्यात शास्त्राrय नृत्याचा पाया घालणाऱया, नृत्याचा (कथ्थक) प्रचार आणि प्रसार करण्यात बहुमूल्य कामगिरी बजावणाऱया कथ्थक नृत्य शिक्षिका शुभलक्ष्मी मांद्रेकर (वय 91) यांचे रविवार दि, 30 रोजी सकाळी 7.15 वा. गोमेकॉत निधन झाले. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ तबलावादक मच्छिंद्र, गोरख (आयएमबीचे उपाध्यक्ष), महेश व नरेश मांद्रेकर, विवाहित कन्या प्रसिद्ध नृत्य शिक्षिका छाया मांद्रेकर, माया व उमा, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रविवार दुपारी 11 वा. त्यांच्या पार्थिवावर पर्रा बार्देश स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळ नानोडा येथील शुभलक्ष्मी यांचा जन्म 1932 साली मुंबईत झाला. कुंदनलाल हे त्यांचे पहिले नृत्य गुरु, त्यानंतर चित्रपटात नृत्य करीत असताना अष्टपैलू वादक, तबलापटू कै. पंडित राजाराम मांद्रेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कालांतराने गोव्यात स्थायिक झाल्यावर पणजीच्या स्वामी विवेकानंद सोसायटीच्या संगीत विद्यालयात त्यांना कथ्थक नृत्य शिकविण्यास पाचारण करण्यात आले. त्याकाळी गोव्यात शास्त्राrय नृत्य शिक्षणाची सोय नव्हती, तसे वातावरण नव्हते. अशावेळी त्यांनी अनेक मुलींना नृत्याची गोडी लावून कथ्थक नृत्यात पारंगत केले. पैकी अनेकांनी गोव्याबाहेर सुद्धा स्पर्धातून यश मिळविले. आजच्या आघाडीच्या सिनेतारका वर्षा उसगावकर यांनी शुभलक्ष्मी यांच्याकडून नृत्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन 1980 साली त्यांना गोवा सरकारने राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिवाय अनेक संस्थानी त्यांचा यथोचित गौरव केला आहे. गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर सरकारने कला क्षेत्राच्या विकासाला हातभार लावलेल्या निवडक बुजूर्ग कलाकारांचा तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्यात शुभलक्ष्मीबाईंचा समावेश होता. बाईंनी तकदीर चित्रपटात प्रथम नृत्य सादर केले. त्यानंतर तारामती, भाईजान आदी चित्रपटांतही नृत्य केले होते.