प्रतिनिधी / रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील ऱायपाटण कदमवाडी येथे पडक्या विहीरीत दोन बिबट्याची पिल्ले मृतावस्थेत आढळली आहेत. सुमारे सहा महिने ते एक वर्ष वयाची पिल्ले असावीत असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दत्तात्रय बाळकृष्ण पळसुले देसाई यांच्या मालकीची विहीरीत ही पिल्ले आढळली.
रविवारी सायंकाळी दुर्गंधी पसरली म्हणुन घरमालकाने शोध घेतला असता विहीरीतुन दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच आत डोकावुन पाहीले असता प्रकार लक्षात आला. वनविभागाचे अधिकारी सागर गोसावी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.