मुंबई/प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? असा सवाल केला होता. त्यावर राऊत यांनी पलटवार केला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना डिवचलं आहे. राज्यपालांवर मी टीका केली नाही. तुम्हाला तसं वाटत असेल त आताच अटक करा, असं खुलं आव्हानच राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? त्यावर पलटवार करताना राऊत यांनी पंतप्रधान मोदीही कधी काली पवारांची काम करत होते, असा टोला लगावला आहे.
मोदींनीही पवारांसाठी काम केलं
राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? असा सवालही चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता. त्यावरही राऊत यांनी पलटवार केला आहे. कधी काळी नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते. आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांचे संबंध आहेत. ते कायम राहतील. शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. चंद्रकांत दादांनी त्याची चिंता करू नये. सरकार पडणार पडत नाही आणि पडणारही नाही, असंही त्यांनी सांगितलं.