प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावषी सर्व कार्यक्रम तसेच सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. 3 डिसेंबर रोजी कनकदास जयंती असून ही जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याची सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकारी व नागरिकांना केली आहे.
दरवषी कनकदास जयंतीनिमित्त शहरातून चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. मात्र, यावषी कोरोनामुळे ही मिरवणूक काढण्यात येणार नाही. अत्यंत साध्या पद्धतीने कनकदास जयंती साजरी केली जाणार आहे. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे ही जयंती करण्यात येणार असून कोरोनाचे नियम पाळत होणार आहे. दि. 3 रोजी सकाळी 9.30 बुडा कार्यालयाजवळील कनकदास सर्कलजवळ कनकदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त चंदशेखर निलगार, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, रमेश गंगूर गुरुजी याचबरोबर इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांचे म्हणणेही ऐकून घेण्यात आले. कनकदासांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे ते अत्यंत मौलिक आहे. त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने वाटचाल करावी, अशा प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केल्या.