प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर येथील कनाननगर वसाहती मध्ये गरीब व मोलमजुरी करणाऱया कुटुंबियांना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी घरून जेवणाचे डबे पाठवून आधार दिला आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून कनाननगर वसाहतीचा व आमच्या घराण्याचा जवळचा संबध आहे. आमच्या कुटुंबाचा एक भागच आहे ाख एक सामाजिक बांधिलकी व या वसाहतीतील लोकांचे कौटुंबिक संबंध यातूनच ही सेवा घडली. शाहू महाराज, राजेसाहेब यांच्या जनहिताचा वारसा मला पुढे नेता येत आहे. हे मी माझे भाग्य समजतो. असे समरजीत घाटगे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अचानक उद्भवलेल्या या जागतिक संकटामुळे हातावर पोट असणाऱया नागरिकांची परिस्थिती बिकट आहे. या काळात अनेकांना पुरेसे अन्न मिळाले पाहिजे या भावनेतून ही सेवा सुरु आहे. संचारबंदी काळात सर्वांना पोटभर अन्न मिळावे म्हणून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या नागरिकांची भोजनाची व्यवस्था करण्यात यावी असे आवाहन केले आहे तरी जिल्हय़ातील भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या जवळपास आश्रयाला असल्यास स्वतः घरात थांबून जी शक्य ती मदत करा. आपण सर्वच लॉकडाऊन व प्रशासनास सहकार्य करा असे आवाहनही समरजीत घाटगे यांनी केले आहे.
mecejpeerle Ieeìies
efpeuneO³e#e YeepeHe