आमदार सुदिन ढवळीकर यांचा गौप्य स्पोट
वार्ताहर / मडकई
गोव्याच्या सीमा सिल केलेल्या असतानाही सरकारच्या कनिष्ठ अधिकाऱयांच्या आशिर्वादाने चेक नाक्यावरून टॅक्सी व खाजगी वाहने गोव्यात येत असल्याचा गौप्य स्पोट माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेतून केला. ही खासगी वाहने रात्रीच्यावेळी सोडण्यात येतात, असा त्यांनी आरोप केला. या कनिष्ठ कर्मचाऱयांच्या बेजबाबदार वर्तनामूळे गोव्यात कोरोनाचा धोका जास्त प्रमाणात असल्याची शक्यता आमदार श्री. ढवळीकर यांनी वर्तवून नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱया या कनिष्ठ कर्मचाऱयांना वरिष्ठ अधिकाऱयांनी वेळीच वठणीवर आणणे आवश्यक आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालण्याची सुचनाही माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
बांदोडा येथे त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार श्री. ढवळीकर बोलत होते. गोव्याच्या सर्व सीमा कनिष्ठ कर्मचाऱयांनी ढील्या केलेल्या आहेत. गोव्यात येणाऱयांची कुठलीच तपासणी न करता त्यांना कुठल्या निष्कर्षावर प्रवेश मिळत आहे. असा सवाल आपल्याकडे तक्रारी करणाऱया नागरिकांनी केला आहे. दक्षिण व उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांचा कुठलाच ना हरकत चा परवाना नसताना त्यांना गोव्यात कसे काय घेतले जाते. असा सवाल आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेतून केला. अशा बेजबाबदार वागण्यामूळे गोव्यात कोरोनाचा धोका अधिक प्रमाणात संभवत आहे. आरटीओ व पोलीस यांच्या संगमताने या टॅक्सी व खाजगी वाहनाना गोव्यात सोडण्याचे त्वरीत बंद केले नाहीत तर ग्रीन झोन मध्ये असलेला गोवा लाल झोन मध्ये कधी जाईल हे कळणारही नाही. वरिष्ठ अधिकाऱयांचा वचक नसल्यामुळे घडलेल्या या गोष्टीवर सरकारने वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे आमदार श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
गोव्याबाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांना गोव्यात आणताना हेच कनिष्ठ कर्मचारी नियमांवर बोट ठेवून कसे सतावणूक करतात यांचे ज्वलंत उदाहरण आमदार श्री. ढवळीकर यांनी दिले. व त्यासंबंधी संतोष टेग्सें व असीत टेग्सें यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारीची प्रत आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांना या परिषदेतून दाखविली. या चेक नाक्यावर त्यांची कुठलीच तपासणी न करता त्यांना फोंडय़ात आणेपर्यंत सहा वाहने बदलून त्यांच्या वेळेचा विनाकारण अपव्यय करून त्यांना कसा त्रास दिला याचा पाढाच आमदार ढवळीकर यांनी वाचून दाखविला. क्वारंटाईन करण्यासाठी त्यांना फर्मागुडीत नेऊन कामगारांच्या खोलीत ठेवण्यात आले. त्यांनतर फोंडय़ाच्या आयडी इस्पितळात नेले. तिथेही त्यांना क्वारंटाईन न करता मडगांवात नेऊन क्वारंटाईन केल्यानंतर त्यांच्याकडून रु. 2500 घेण्यात आल्याची माहिती आमदार श्री. ढवळीकर यांनी दिली. टेग्सें यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा व्हॉटस ऍपचा मेसेज त्यांना दाखविला. पण त्यांनी काहीच न ऐकता रु. 2500 ही प्रवेश फी तुम्हाला द्यावीच लागेल असे सांगून पैसे घेतले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा प्रकारात लक्ष घालून सामान्य जनतेला होणारे त्रास वाचवावेत अशी मागणी आमदार ढवळीकर यांनी केली.