वृत्तसंस्था/ लॉसेनी
2023 साली होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक कनिष्ठांच्या पुरूष आणि महिला हॉकी स्पर्धांचे यजमानपद मलेशिया आणि चिली भूषविणार असल्याची माहिती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
2023 सालातील पुरूषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद मलेशियाला देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 2023 साली होणाऱया महिलांच्या कनिष्ठ विश्व चषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद चिलीला बहाल करण्यात आले आहे. पुरूष आणि महिला कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील सामने कौलालंपूर आणि सांतियागो शहरामध्ये खळविले जाणार आहेत. 21 वर्षांखालील वयोगटातील या स्पर्धेमध्ये पुरूष गटात 16 तसेच महिला गटात 16 संघ सहभागी होणार आहेत. 2016 साली लखनौमध्ये झालेल्या पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकाविले होते. 2021 सालातील विश्वचषक कनिष्ठांची पुरूषांची हॉकी स्पर्धा भारतामध्ये होणार आहे.